नवी दिल्ली : "मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे" अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सरकारी कंपनी विका मोहिम चालवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधींनी वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण शेअर केले आहे. यात सरकार एलआयसीमधील 25 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे म्हटले आहे.

No comments:
Post a Comment